Monday, May 14, 2012

काळेवाडीचा पुणेरी पाहुणचार(?)


पाचचा गजर झाला आणि नानगुडे पाटील उठले. अंघोळ करून त्यांनी हनुमान चालीसा वाचली आणि अभ्यास चालू केला. साडेसात-आठच्या सुमारास अभ्या उठला. थोड्या वेळ gallery मध्ये जाऊन त्याने आजूबाजूला नजर टाकली. (का म्हणून विचारू नका.) हळूहळू काळेवाडी आघाडी जागी झाली. (तशी ती चोवीस तास जागी असते कारण जहापन्हा पहाटे कधीतरी झोपतात.)

मग नऊ वाजता बंगाना जाग आली. बंगानी थोडा वेळ पडल्या पडल्या विचार केला आणि मग पंख्याकडे नजर टाकली. (ती त्यांची खासियत आहे.) शेवटी बंगानी आता उठायला पाहिजे असा निर्णय घेतला. बंगांनी अंघोळ उरकून घेतली व खोलीला कडी लावून आतमध्ये रामरक्षा वाचायला चालू केली. (आतमध्ये मी रामरक्षा वाचतो असा बंगांचा दावा आहे. खरे खोटे माहित नाही.)


सगळ्यात शेवटी म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर, लोकांची अर्धी कामे झाल्यावर अभ्याची Gym उरकल्यानंतर नानगुडे पाटलांचा अभ्यास करून व orkut-facebook सहित सर्व बघून झाल्यानंतर, बंगांचे सगळे पेपर वाचून झाल्यानंतर जहापन्हा उठले. तोपर्यंत १२:३० झाले होते. जहापन्हानी आरश्यात बघत केस ठीकठाक करून आपण माणसात आलोय याची खात्री करून घेतली. त्यानंतर जहापन्हा बाहेर येऊन पेपर वाचत बसले. पाच-दहा मिनिटानंतर अभ्याची करडी नजर जहापन्हावर पडली. आणि जहापन्हा समजले कि सगळी मंडळी जेवणासाठी थांबली आहेत. जहापन्हानि पेपर सोडला आणि दात घासण्याचा ब्रश हातात घेतला.


जेवण करत असताना अभ्याच्या मोबाईल वर तबला वाजला (तबल्याची ringtone हो...) अभ्याने फोन उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या प्रयत्नात UPSC-prelim पास व्हावी तसा आनंद झाला. त्याच कारणही तसं खासच होत. सदाशिव पुणेकर हा आमचा एक नंबरचा चिकट मित्र. कधी स्वताच्या पैशाने चहा म्हणून पाजला नाही. उलट बिल द्यायची वेळ आली आहे हे त्याला अंतर्ज्ञानाने अचूक समजत (पुणेकरांना सगळ्या गोष्टीच उपजतच ज्ञान असत म्हणा..पुणे तिथे काय उणे) आणि हा फोन आल्याचा बहाना करून बरोबर सटकतो. तर ह्या सदाशिव पुणेकरान आम्हाला चक्क घरी जेवायला बोलावलं होत. घोरपडी का काय असलाच प्राण्याच नाव असलेल्या ठिकाणी त्याने नवीन घर घेतलं होत.
दुसऱ्या दिवशी काळेवाडी आघाडीचे सदस्य खुशीतच होते. आज संध्याकाळीच जेवनाच निमंत्रण होत. दुपारच्या जेवणात मावशींना फक्त वरण भात सांगण्यात आला. संध्याकाळी पाच वाजता काळेवाडीचे चार सदस्य - अभ्या, बंग, जहापन्हा आणि नानगुडे पाटील हे घोरपडीला जाण्यास निघाले. नानगुडेनची सफारी गाडी काळेवाडी च्या दिमतीला असल्यामुळे कसे जायचे हा प्रश्न नव्हता. प्रथम आम्हाला कोथरूडला जायचे होते. कारण काळेवाडीचा माजी सदस्य भाऊ(उर्फ मराठवाड्याचा Marx) सध्या तिथे राहतो. तोही आमच्या सोबत येणार होता.कोथरूडवरून भाऊला घेऊन आमची स्वारी घोरपडीला निघाली. कॅम्पात पोहोचेपर्यंत प्रवास सुरळीत झाला. तिथे मात्र एका वळणावर आल्यावर डावीकडे जायचे कि उजवी कडे असा पेच पडला. तिथे भाऊने Marx ची two class theory मांडली. डाव्या बाजूला झोपडपट्टी होती त्यामुळे उजव्या बाजूला capitalist क्लास रहात असावा असा निष्कर्ष भाऊने काढला. पण आमचा मित्र मध्यमवर्गात मोडत असल्या मुले व Marx च्या तत्वज्ञानात मध्यम वर्गाला स्थान नसल्यामुळे भाऊला हि theory मागे घ्यावी लागली.
आपण पुण्यात फार वर्षे राहतो त्यामुळे कुणाला पत्ता विचाराने हे कमीपणाचे लक्षण आहे अस मानून आम्ही कॅम्पात डावी उजवी वळण घेत राहिलो. अर्ध्या तासानंतर अस लक्ष्यात आल कि आपण पुन्हा त्याच ठिकाणी परत आलो आहोत.


थोड्या वेळाने जहापन्हांच्या अस लक्ष्यात आल कि बंग हे घोरपडीला एकदा जाऊन आले आहेत. बंग कुठे आहेत याच्या शोध घेतल्यानंतर अस लक्ष्यात आल कि बंग हे गाडीच्या मागच्या सीट वर निवांत झोपले आहेत. पण गाडी थांबल्यामुळे तेही खडबडून उठले. बंगानी दिशादर्शनाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र आमची स्वारी सुरक्षितपणे घोरपडीला इच्छितस्थळी जाऊन पोहचली.


घराच्या परिसरात गाडी पार्क करून काळेवाडीचे सदस्य उतरले. तोपर्यंत संध्याकाळचे साडेसहा झाले होते. समोरच्या रस्त्यावरून जाणारी सौंदर्यस्थळे जहापन्हानी अचूक हेरली व त्यावर भाऊशी तपशीलवार चर्चा चालू केली. नानगुडे पाटलांनी चालता चालता 'या बिल्डिंग चे गेट जर थोडे मोठे असते तर आपल्याला ट्रक आणता आला असता यावर अभ्याशी वाद घालायला चालू केला. त्यावर बंगांनी 'आपण ट्रक घेऊन कशाला येणार असा प्रतिप्रश्न करून नानगुडेना निरुत्तर केल.
घरी पोहचल्यावर आमच्या मित्राने आमचे मोठ्या प्रेमाने(? बहुतेक) स्वागत केल. थोड्यावेळाने आम्हाला त्याने घर दाखवायला चालू केल.नवीन घर घेतलेल्या लोकांना भेटताना तुम्हाला हे ऐकून घ्यावंच लागेल ते म्हणजे : 'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे आणि तरीपण आपण त्याला कस गंडवल . मग rate कसा कमी केला, घर स्वस्तात कस मिळाल... पार्किंग space कशी मिळाली ... हाच मजला कसा बेस्ट आहे वगैरे वगैरे . सदशिवाने पण gallery कशी spacious आहे , kitchen मध्ये कशी छान हवा येते वगैरे तांत्रिक बाबी सांगितल्या. शेवटी एकदाचे घर बघण्याचे सोपस्कार पार पाडून आम्ही hall मध्ये येऊन बसलो.
मग काकुनी आम्हाला 'पोहे खाणार का ? अस विचारलं.
पहिल्यांदा लगेच होय कस म्हणायचं या रीतीरिवाजानुसार आम्ही 'नको-नको -कशाला' अस करू लागलो.(अर्थात पोहे खाल्यानंतर जेवण कमी जाईल हा सुज्ञ विचार त्यामागे होताच)


तरीही पोहे खायला हरकत नाही अस एकंदर आमच मत बनत चालल होत. पण एवढ्यात सदाशिव पटकन म्हणाला 'अरे पोहे नाही अर्धा कप चहा तरी घ्या'. त्यावर भाऊने चपळाई दाखवत 'हो चहा चालेल' अस म्हणून होकार देऊन टाकला. आणि थोड्या वेळात आमच्यासाठी अर्धा अर्धा कप चहा आला. (यालाच कदाचित half tea diplomacy म्हणत असावेत!!!!)
चहासोबत गप्पा मारता मारता साडेसात होऊन गेले..............


<पुढे चालू>


सर्व मंडळींचे लक्ष नाही म्हंटले तरी किचेन कडे होतेच. थोड्या वेळाने आमचा मित्र आलोच हं एका मिनिटात म्हणून आत गायब झाला. पाच-दहा मिनिटे अशीच गेल्यावर मात्र आतून फोडणीच्या आवाजापाठोपाठ फोडणीचा वासहि दरवळला. मग मंडळी थोडी relax झाली. भाऊ ला कोपऱ्यात ठेवलेली काही पुस्तके दिसली आणि भाऊ ती चाळण्यात मग्न झाला. अभ्या व जहापन्हा gallery त जाऊन रस्त्यावरच्या लोकांना न्याहाळू लागले. बंगानी बाजूचा pune times उचलून वाचायला (? कि बघायला) चालू केला. तर नानगुडे पाटलांना कुठेतरी कोपऱ्यात एका सुडौल शरीरयष्टीचा फोटो दिसला(पुरुषाचा.. उगीच नसत्या कल्पना नको) व तो पाहण्यात ते दंग झाले.


आठ वाजून गेले. हा मित्र हि आतच गायब होता. आता मंडळींच्या position हि बदलल्या होत्या. नानगुडे पाटील पुस्तक वाचक होते तर बंग body builder ला बघण्यात दंग झाले. भाऊ gallery त पळाला तर अभ्या आणि जहापन्हा नुसतेच शून्यात नजर लाऊन बसले होते. tv वरच्या मराठी मालिकांचे स्वर आतून ऐकू येऊ लागले होते. 'चला आता जेवायला घ्या' हे उत्साहवर्धक शब्द ऐकायला सर्व जण अधीर झाले होते. साडेआठला सदाशिव बाहेर आला(अरे वाह). 'अरे sorry बरका. फोनवर बोलत होतो' - इति सदाशिव. 'बर माझे ट्रेकचे फोटो दाखवतो तुम्हाला'. आमच्या मित्राला कुठेतरी डोंगरावर कानाकोपऱ्यात अडचणीच्या जागी चढून जायची व आपण तिथे गेलो होतो हे दाखवण्यासाठी तिथले फोटो काढायची आवड होती (त्यालाच काही लोक ट्रेक असहि म्हणतात). तर हे ट्रेक चे फोटो दाखवण्याचा कार्यक्रम बराच वेळ लांबला. आम्ही पण 'अरे वा' 'छानच' ' मस्त आहे' 'सहीच' अस काहीतरी उगीच बोलायचं म्हणून बोलत होतो. आता tv वर मराठी मालिकांच्या जागी सासबहुच्या हिंदी serial लागल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आम्हाला मग लक्षात आल कि आपली काहीतरी गफलत झाली आहे. थोड्या वेळाने मग आता परिस्थितीचा अंदाज घ्यायचा म्हणून जहापन्हानि एक खडा टाकून पाहिला.


'बराच उशीर झाला आहे आम्हाला निघायला' - जहापन्हा
'हो माझ्या लक्षातच आल नाही.. उगीच तुम्हाला फोटो दाखवत थांबवून ठेवलं, या पुन्हा असेच निवांत' - इति सदाशिव
आता मात्र सगळ्या मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे झाले झाले. अभ्यानेच फोन वर निमंत्रण स्वीकारले होते त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्याने चेहऱ्यावर आता बाहेर जाऊन काय असेल ते settle करू असा भाव आणला. मग निरोप घेऊन आम्ही बाहेर निघालो. निघता निघता काकू म्हणाल्या 'जेवायला थांबला असता तर बर झाल असत..'
कदाचित 'जेवायला' याच्यापुढचे शब्द जहापन्हा नि ऐकले नसावेत ते तसेच पादत्राणासहित आत जायला निघाले पण नानगुडे पाटलांनी बाका प्रसंग ओळखून त्यांना मागे खेचले.
काळेवाडीचे सदस्य मग आपल्या कार्यालयात परत आले आणि रात्री खिचडी भात करून त्यांनी आपली भूक भागवली.


मित्रानो या अनुभवातून आघाडी बरीच शहाणी झाली आहे. आघाडीने असे बाके प्रसंग इतर लोकांवर ओढवतील याची सामाजिक जाणीव (याबाबतीत काळेवाडी नेहमी आघाडीवर असते म्हणूनच 'काळेवाडी आघाडी' असे नाव आहे ) ठेवून काही नियमावली तयार केली आहे.


१. कोणत्याही पुणेकराचा तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देणारा फोन/इमेल/अन्य आल्यास स्वताला चिमटा काढून आपण स्वप्न तर पाहत नाही ना याची खात्री करावी. समोर कोणी असल्यास त्याला चिमटा काढायला सांगणे उत्तम...


२. इतके केल्यानंतर पुन्हा जाताना एकवार फोन करून त्याच वर्षाच्या दिवशीचे निमंत्रण आहे का हे पडताळावे.


३. कुणाही पुणेकराच्या घरी गेल्यानंतर काही हवे का म्हणून विचारले तर पटकन हो म्हणावे अन्यथा पाणी सुद्धा मिळणे दुरापास्त होईल.


विशेष सूचना - वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील पात्रे मात्र वास्तव जगातील आहेत. तसेच या लेखामुळे कोणत्याही पुणेकराच्या व प्राणी संघटनेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याला काळेवाडी आघाडी जबाबदार असणार नाही. तसेच याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.


सर्व हक्क @काळेवाडी आघाडी

धान्दल.. गडबड ......आणि सुटका


१४ सप्टेबर २००२ ..महाविद्यालयीन जीवनातिल दुसर वर्ष.. (वेळ आणि वर्ष दिल्यामुले लेखास भारदस्त पणा येतो .. तुम्ही टेन्स होऊ नका ..वाचा .वाचा ) आम्हि नेहमीप्रमाने काही बोधपर (? जाणकार लोकास अधिक सान्गणे नलगे..)चित्रपट पहात आमच्या सन्गनकासमोर बसलो होतो. चित्रपट अगदी रन्गात (अनुस्वार कसा द्यायचा हो ? ) आला होता. आमच्या काहि मित्रानि चित्रपटापासुन प्रेरित होऊन सुचक हालचालि चालु केल्या होत्या. आत आत शिरणार्‍या गुदगुल गप्पा चालू होत्या.. सर्वजन आपापले ज्ञान भाण्डार उघडून बसला होते. (काय ज्ञान असत एकेकाच हो .. !!!!)आणि अचानक घात झाला.( चु़क! चुक!! करू नका .. गुदगुल गप्पा डिटेल मध्ये लिहायला काहि माझी ना नाही ..पण काय करनार मराठी लेख आहे.. विन्ग्रजी नावेल नाहि ...ठिक आहे लेखास नाट्यपुर्ण वळन देतो...हे घ्या ) कुणितरी दरवाजा उघडाच ठेवला होता. त्या दरवाज्यातुन आमचे दुश्मन खानावळी 'फेमस' मामा नी प्रवेश केला. आणि आमची लागली. (खानावळीचे बिल महिने न महिने न भरता तुडूम्ब जेवून मामाच्या खान्द्यावर हात टाकुन बोलन्या इतके अजून आम्हि अजून काही सराईत झालो नव्हतो.. ) मामा आत प्रवेश करत होते. आणि काहिजण सन्गनकाच्या कळफलक शोधायला धावले. पन आम्ही कशाला मध्ये कटकट म्हणून बाजुला कोपर्‍यात सारला होता. उन्दिर नियंत्रकाचि धान्दल उडाली. तेवढ्यात कुनाच्यातरि रिकाम्या डोक्यात कल्पना सुचली आणि रणांगनात बाजिप्रभुनी तलवार फिरवली त्या चपळाइने त्याने संगनकाचा (अनुस्वार सापडला रे ..ओबो .बो..बो.) वीजपुरवठा तोडला (काय ? माहित नाहि वीज पुरवठा कसा तोडतात ते ? बिल न भरून बघा मराविमचे ..बघा कसे येतात घर शोधत शोधत ..) ...शांतता .. सगळे चुपचाप.. सगळे बन्द झालेल्या मॉनिटर कडे डोळे भरून (कौतुकाने!!!) पाहताहेत..मनामध्ये त्या वीरबद्दल अतीव भावना दाटुन आलेल्या.. आला प्रसंग त्याने निभावुन नेला होता ...
मामा आता पूर्ण आतमध्ये..सगळे पुन्हा एकदा मॉनिटर कडे टक लावून बघत आहेत.
मामा येवून चांगली पाच मिनीटे झाली. कुणी मामांना ओळख दाखवायला तयारच नाहि ..सगळे अगदी समोर बघतायेत...
आणखी दोन मिनिट थांबून मामा फुटले...
" कारे पोरानो..... ह्या साठी तुम्हाला इथे शिकायला ठेवलं आहे का ? एकतर अभ्यास करत नाहि आणि मेसचं बिल पण भरत नाहि" (काय संबंध ?)... अरे बापरे कळल कि काय ? तरी मी शक्य तितका मामा आणि मॉनिटर च्या मध्ये यायचा प्रयत्न केला होता.
एकजण म्हणाला " कुठ काय मामा .. ह ह ह्ह (असच काही तरी हसतात अशावेळी) ..असच्च..बसलोय .. गप्पा मारत ".
"आणि बन्द टि व्ही समोर बसून काय करताय ?? "(हात्तिच्या..एवढच ना ..थांबा कारण फेकतो..म्हनजे सान्गतो).
आता ह्याना किती वेळा सांगायच की हा टि व्ही नाहि...जाउदे... मरूदे...आधि कारण फेकतो..(हाण सावळ्या .. लढ ..लढ..)"अरेच्च्या बंद झाला काय? कळलच नाहि बघता बघता....थांबा पुन्हा चालु करतो... अरे टिव्ही लाव रे .. मामांना टिव्ही बघायचाय.. बसा मामा.."
"बर बर ..मी बसायला आलो नाहि .. बिल कुणि कुणि भरल नाहि इथे ते सांगा लवकर मला सगळी कडे चक्कर मारायची आहे.."
आणि एकदाचे मामा कटले.. पुढे पुढे मामा आमच्या कडे येऊन आमचा टिव्ही (??) बघन्या इतकी आमची सलगी झाली.
पण हा प्रसन्ग आठवला कि अजून हसू येत ..(असं म्हणायच असत लेखाच्या शेवटी. --पु ल नावाच्या एका होतकरू लेखकाला पण मी हाच सल्ला दिला होता .. हुश्य करू नका अजून लेख बाकि आहे...)
मंडळी तुमच्या पण आयुष्यात असे प्रसन्ग आले असतिल.. तुमची पण अशीच लागली असेल कधीतरी.. तुमच्या प्रतिसादांची वाट बघतो आहे.. (दुसर काम काय आम्हाला..ही ही)
मिपा वर प्रवसवलेल हे पहिलच लाडकं लेकरू .. (म्हणजे पहिला लेख हो..).. तुमच प्रेम आनि कवतिक मिळाल तर दुसरा भाग उपसायला आम्ही मोकळे...इथे नियोजन नाही..
हा लेख या ओळीपर्यन्त वाचनार्‍या वाचकांच्या सहनशक्तिचे कौतुक करून माझे लाडके कवतिक इथेच संपवतो ...(बघा ...इथपर्यन्त वाचाल तर फुकट कौतुक मिळेल....)

Thursday, February 3, 2011

उशीर झाला?? ... Dont Worry

हलो हलो .. हा अरे आलोच
किती वेळ १५ मिनिटात येतो म्हणाला होतास...
अरे हो तेव्हाच निघालो होतो पण ट्राफिक मध्ये अडकलोय ..
कधी निघालास ?
अरे अर्धा तास झाला निघून.... पण काय करणार ट्राफिक किती आहे...
आताही सिग्नलला थांबलो आहे .. चल सिग्नल सुटेल .. ठेवतो..
शांतपणे हा मोबाईल खिशात ठेऊन चहाचा शेवटचा घोट संपवतो आणि दुचाकीकडे चालू लागतो... दुचाकीला किक मारून हा निघतो..
उशीर करण्याची अनेक कारण आहेत ..इथे तर लिस्ट च देता येईल ...
हो आलोच जवळच आहे...
अरे ट्राफिक मध्ये अडकलोय...
घरून फोन आला म्हणून उशीर झाला..
पेट्रोल संपल.. त्यामुळे वेळ लागला...
लाईट गेली होती.. अंघोळ राहिली होती
निघालोच होतो पण ऑफिस मध्ये अचानक काम आल..
मीटिंग होती....
अरे मामानी( का मामी ? असा गोड प्रसंग आम्हाला कधी आला नाही बाप्पां ...) अडवलंय....
ATM ला थांबलोय पण खूप मोठी रांग आहे ?
उशिरा येन हा भारतीय लोकांचा गुणधर्मच आहे ..त्यासाठी आपल्याकडे अनेक कारण तयार असतात. त्यातही एक creativity आहे. मुळातच उशीर कारण हि पण एक prestige ची गोष्ट आहे अस आम्ही मानतो.. (जस अजित आगरकर स्वताला अष्टपैलू मानतो). आता उशिरा येन आणि उशीर झाल्यामुळ दिलीगिरी व्यक्त करत दिनवानेपणे कारण सांगणे ... हि तर सर्वसामान्य लोकांची लक्षण आहेत. आता ह्या खेळत निर्ढावलेले उशिरा आल्यावर कस वागतात बघू. मुळात हि लोक १५-२० मिनिट उशीर होण वगैरे क्षुल्लक वेळेला किंमत देत नाहीत .. १५-२० मिनिटाचा तो वेळ त्यात कसला उशीर मानायचा.. तर हि लोक क्वचितच एवढा कमी उशीर करतात. यांचा उशीर म्हणजे १-२ तास उशिरा येन असत.. आता एवढा उशीर केल्यावर समोरचा आधीच वैतागलेला असतो. त्याला अपेक्षा असते हा आल्यावर अत्यंत खजील चेहरा करून येईल, दिलगिरी व्यक्त करेल.. पण हे लोक अत्यंत निर्ढावलेले असल्याने जणू काही वेगळ घडलाच नाही असा चेहरा घेऊन येतात.. अत्यंत मख्ख चेहरा ठेवतात (मख्ख चेहरा....?? अभिनय करत असलेला सुनील शेट्टी अथवा .. नाहीतर कुठल्याही परिस्थितीत खेळत असलेला द्रविड आठवा.. काहीच नाही तर आपले दिग्विजयसिंग आठवा ). समोरचा कितीही वैतागलेला असला त्याचे एकेक बौन्सर सोडून देतात. परत वार करतात कि मी आलो तेच महत्वाच नाही का ? बघा परत कुणाची हिम्मत होत नाही झापायची ...

अल बरुनी नावाचा एक प्रवाशी इ.सनाच्या ११ शतकात भारतात आला होता. (या बाहेरच्या लोकांना काही काम नसतात उठसुठ भारतात येतात भेटी द्यायला आणि उगाच इतिहासाचा अभ्यास वाढवून ठेवतात. उगीच ती चित्रविचित्र नाव पाठ करा. आपली लोक बघा कुठ फिरायला गेले नाहीत ना युध्द करायला. उगीच बाकीच्या लोकांचा इतिहास कशाला वाढवून ठेवा.. ) तर ह्या अल बरुनी या माणसाने भारताविषयी, इथल्या लोकांविषयी बराच काही लिहून ठेवलंय. त्याने म्हटलंय कि भारतातले लोक अस समजतात कि त्यांच्यासारख विज्ञान कुठे नाही , त्यांच्यासारखी संस्कृती, भाषा, गणित कुठेच नाही.थोडक्यात भारतासारख्या प्रगत देश कुठेच नाही अस भारतीय लोक मानतात. (बहुदा हे लिहिताना तो पुण्यात असावा. बघा बघा जुन्या इतिहासकालीन नोंदी काढून पहिल्या पाहिजेत). तर ह्याने भारतीयांच्या प्रत्येक गोष्टींबद्दल अगदी सविस्तरपणे लिहिलंय.खूपच सविस्तर लिहिलंय .. पण आपल्या उशिरा येणाच्या सवयीबद्दल कुठेच काही लिहल नाही. म्हणजे हि सवय जुनी नाही तर अलीकडच्या काळातली असावी. पण हि सवय चटकन फोफावली आणि तिचा चांगलाच विस्तार झाला. आजकाल कुणी उशिरा येत नाही हो ? ऑफिस ला लोक उशिरा जातात. रेल्वे उशिरा धावते. विमाने उशिरा उडतात. नेते सभेला उशिरा येतात. खेळाची मैदान उशिरा तयार होतात. (बघा कोलकाता...) CBI वाले उशिरा धाडी टाकतात आणि काही लोकांना अटक करायला विसरून जातात आणि नंतर उशिरा अटक करतात, विजेचे प्रकल्प सुरु व्हायला उशीर होतो.......... तर आपला सगळा देशच उशिरा चालतो.

आता या उशिरा येण्यातही एक कला आहे. उशिरा आल्याची कारण सांगण हा नंतरचा भाग झाला. पण उशीर करणं हि कला समजून घेतली पाहिजे.
तुम्हाला अचानक काहीतरी महत्वाच काम निघाल, ट्राफिक मध्ये अडकलात, वेळेवर झोपेतून उठला नाहीत म्हणून तुम्हाला उशीर झाला तर हि एक सर्वसामान्य बाब आहे. यात कसली आलीय creativity ? खर कसब तर यापैकी कोणतीच गोष्ट घडली नसताना उशीर करणे यात आहे . आता या कलेत पारंगत मंडळी कसा उशीर करतात पाहू. या लोकांना आता बाहेर निघायचं आहे आणि हे आवरत आहेत. आतापर्यंत सगळ वेळेवर झालाय आणि हे वेळेवरच पोहोचणार अस एकंदरीत चित्र आहे. नेमक बाहेर पडण्यापूर्वी आरशात पाहताना यांना जाणवत कि शर्ट काही match होत नाही. मग हे आपल्या सोबत्याला विचारतात तो म्हणतो (नेहमीप्रमाणेच) अरे मस्त दिसतोय ना.. याला काय झाल ? तरीही हे शर्ट बदलतात. पण त्यानंतर लक्षात येत कि आधीचाच चांगला होता. मग पुन्हा तो शर्ट घातला जातो. ह्यामध्ये एक १० मिनिट निघून जातात (अजून काही पुरेसा उशीर झाला नाही). मग पुढे हे पादत्राण घालायला जातात. बाहेर पडणार एवढ्यात लक्ष्यात येत अरेच्चा मोबाईल राहिला वाटत, पुन्हा आत पळतात. मग रीतसर घराला कुलूप लाऊन बाहेर पडणार तेवढ्यात यांच्या लक्षात येत अरे चहा पिला पाहिजे आणि सोबत जळती काडी पेटवली पाहिजे (हि लोक तर प्रत्येक ठिकाणी उशीर करतात). पुन्हा त्या कार्यक्रमात १५-२० मिनिट जातात. आता सगळ आवरून एकदाच बाहेर पडतात. घरातून रस्त्याकडे चालायला लागतात आणि एकदम काहीतरी आठवल्यासारख करून पुन्हा घराकडे पळतात. आता यावेळी काही विसरलेल नसत. हे त्यांच्याही लक्षात येत. पण घराच्या बाहेर थांबलेल्या आपल्या सोबत्याला (सख्याला) वाटू नये कि हा उगीच परत गेला म्हणून थोडा वेळ घरात रेंगाळतात.
अशा रीतीने चांगला पाऊन एक तासाचा उशीर केल्यानंतर यांच्या जीवाची शांती होते.
तर या उशीर करण्याच्या कलेबद्दल मी लिहल. पण उशिरा आल्याबद्दल कारण सांगणे याबद्दल काय वेगळे सांगणे नलगे...
यात सगळे भारतीय एवढे निपुण आहेत आहेत कि ते कधी आपल्या दूरच्या आजीला मारतील , कधी गाडी puncture करतील, कधी मित्राचा अपघात करतील हे सांगता येत नाही !!! तुम्हालाही असे बरेच अनुभव -प्रती-अनुभव आले असतील त्यामुळे या गोष्टी मी वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून देतो.

उशिरा येण हि मुळात आपली राष्ट्रीय संकृती आहे त्यामुळे यापुढे उशीर झाला तर अजिबात वाईट घेऊ नका. उशीर करा आणि समोरचा उशिराच येईल अशी अपेक्षा करा (अर्थात तुम्ही यात आधीच निगरगट्ट आहात हे ओळखतो आम्ही..)
त्यामुळे याबद्दल जास्त न बोलता मी आपले उशीर पुराण संपवतो.